मैदानाबाहेरही दादाचा शेन वॉर्नला धोबीपछाड!
By आनंदनगरी वेब टीम | Wed 14-06-2017 | 11:21:20 am
फोटो
मैदानाबाहेरही दादाचा
शेन वॉर्नला धोबीपछाड!
सौरव गांगुलीसोबत पैज हरल्याने शेन वॉर्न एक दिवस इंग्लंडची जर्सी घालणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत पैज लावणं ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नला चांगलंच महागात पडलंय. कारण सौरवसोबत लावलेली पैज हरल्यामुळे शेन वॉर्नला एक दिवसभर इंग्लंडच्या संघाची जर्सी घालून राहावं लागणार आहे. शेन वॉर्नने यासंदर्भात ट्विट करुन आपली हार मान्य केली आहे.
लंडन येथे एका कार्यक्रमादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने चॅम्पियन्स करंडकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत असा अंतिम सामना होईल, असं भाकीत केलं होतं. पण सौरव गांगुलीने क्लार्कच्या या मतावर असहमती दर्शवून इंग्लंडचा संघ या स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करेल, असं वक्तव्य केलं.
नेमक्या याच वेळी शेन वॉर्न चर्चेत आला आणि त्याने इंग्लंड ऑस्ट्रेलियासोबत साखळी सामना देखील जिंकणार नाही, असं छातीठोकपणे वक्तव्य केलं. हे ऐकून सौरव आणि शेन वॉर्नने पैज लावली, ज्यात ऑस्ट्रेलिया सामना हरल्यास शेन वॉर्नने दिवसभर इंग्लंडची जर्सी घालायची असं ठरलं. आणि झालंही सौरव गांगुलीने म्हणल्याप्रमाणेचपावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर डकवर्थ लुईस पद्धतीने धावांनी मात केली. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या दादासोबत पंगा घेण शेन वॉर्नला कसं महागात पडलं याचीच चर्चा गेले काही दिवस सोशल मीडिया आणि ट्विटरवर रंगताना दिसतेय.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California