नवे जग आणि मनुष्यबळ विकास

प्रतिक्रिया

एकविसाव्या शतकामध्ये मनुष्यबळ विकास हा परवलीचा शब्द बनला आहे.2020 मध्ये भारताला जर महासत्ता व्हावयाचे असेल तर वैश्विक आव्हानांना सामोर जाण्याची आणि नवी व्यूहरचना करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने करावयाच्या प्रयत्नांची दिशा या लेखात मांडली आहे.भारतासारखा विकसनशील देशामध्ये मनुष्यबळ विकासाला अत्यंत महत्व आहे. कारण वाढलेली लोकसंख्या ही भार नमून वरदान आहे. असे मानले जात आहे. ते खरेच आहे. उद्याच्या जगात उंच मानेने उभे  राहावयाचे असेल तर भारताला प्राधान्याने मनुष्यबळ विकासावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी 12 व्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष सर्व समावेशक विकास हे ठरविण्यात आले आहे. शिक्षणाची गणना नव्या जगामध्ये मनुष्यबळ विकास आणि शाश्वत विकासात करण्यात येत आहे. त्यामागचे हेच खरे कारण होय.

आजचे आव्हान उद्याची संधी
मनुष्यबळ विकासामध्ये आजचे आव्हान ही उद्याची संधी होय. हे प्रकर्षाने लक्षात घेतले पहिजे. भारताला जर आपला विकास वेग दुप्पट करावयाचा असेल तर शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता संवर्धनावर भर देण्याची गरज आहे. एकूणच भारतीय  समाजाची मनोरचना आणि मानसिकता बदलण्यावर भर देण्याची गरज आहे. त्याशिवाय राष्ट्रीय विकासाचा वेग दुप्पट कसा होणार? 21 व्या शतकामध्ये प्रशिक्षण आणि प्रबोधनाचे तंत्र आणि रचना यामध्ये बदल होत आहेत. भारताचाही या दृष्टीने नवीन प्रशिक्षणामध्ये भारतीय आत्मा रुजविण्याची गरज आहे.
1. भारतीय उद्योगामध्ये गुणवत्ता जोपासण्यासाठी नवे प्रशिक्षण तंत्र हवे.
2.सामुदायिक जाणीव-जागृतीतून नवे उत्साहवर्धक वतावरण तयार करण्याची  गरज आहे.
3.वस्तू व सेवा यांचा दर्जा उंचावला पाहिजे. म्हणून प्रत्येक खाजगी अथवा सार्वजनिक कंपनीला नवे संजीवन सामर्थ दिले पाहिजे.

गुणात्मक परिवर्तनासाठी
आपल्या संस्था आणि व्यवस्थामध्ये जर गुणामत्क बदल घडवून आणावयाचे असतील तर अत्यंत चतुराईने नफा बौद्धिक प्रतिमानांचा विकास केला पाहिजे.उद्याच्या जबाबदार भारतीय कंपनी आणि उद्योगसमूहांना मनुष्यबळ विकासाचे सूत्र आणि महत्व प्रामुख्याने कळाले पाहिजे आणि त्याद्वारे त्यांना नव्या कार्यक्षम व्यवहारांची जाणीव झाली पाहिजे. संस्था ग्राहक आणि कर्मचाचारी यांचे हितसंबंध जेव्हा एकत्र येतात तेव्हा संस्थाच्या रचनात्मक कार्यात संपूर्ण बदल होतो असे शास्त्र सांगते. त्यामागे सुसुत्रता व समन्वयक या दोन तत्वांची भक्कम बैठक प्रस्थापित करण्याची गरज आहे. नेतृत्व, कर्पोरेट व्यवस्थापन, ग्राहक संपर्क, जनसंपर्क शैली, समस्या पूर्तीची दृष्टी यामुळे गुणात्मक बदल घडू शकतात. बांधिलकी ही स्वयंप्रवर्तन, स्वयं  संघटन, स्वयं नियंत्रण ही जबाबदारी यावर अवलंबून असते. कुठल्याही कार्यात पुढाकार घेताना स्वयं व्यवस्थापन, परस्पर सद्‌भाव, नेटवर्किंग सतत शिकण्याची इच्छा जबाबदारीची जाणीव हे घटक आवश्यक असतात. यासर्व घटकांची साधना करणे गरजेचे असते.

संक्रमणावस्थेत मनुष्यबळ
संबंध जनामधील मनुष्यबळ विकास संकल्पना ही संक्रमणावस्थेतून जात आहे आणि ती बदलाच्या उंबरठ्यावर आहे.अंतर्गत ग्राहकांचे उद्‌बोधन ही एक नवीन संकल्पना आहे. सतत काही तरी नवीन शिकण्याचा भयान करणारी संघटना ही नव्यायुगातची गरज आहे.

नवी दृष्टी नव्या भूमिका
मनुष्यबळ विकास ही सामाजिक व आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. प्रशिक्षण हे संस्थात्मक जीवनामध्ये बदल घडवून आणणारे सूत्र होय. महाविद्यालये व विद्यापीठे ही नव्या जगात मनुष्यबळ विकासाचे नियोजन करणाऱ्या यंत्रणा आहेत. त्यांचे नव्याने सामर्थ लक्षात घेतले पाहिजे. व्यवस्थापनामध्ये आता बहु संस्कृतिक दृष्टी विकसित होत आहे. स्त्री-पुरुष समानतेचे सूत्र लक्षात घेऊन व्यवसाय आणि उद्योगात महिलांना उच्च दर्जाचे स्थान प्राप्त करुन दिले पाहिजे व त्यांच्या आत्म्यांचा राष्ट्र उभारणीत उपयोग करुन घेतला पाहिजे. उच्चतम कामगिरीचे नियोजन करण्याची मनुष्यबळ विकासावर भर देण्याची गरज आहे. बदल आणि विकास हा नव्या जगाचा आत्मा होय. समाज संधी सर्वांसाठी उपलब्ध आहेत. पण त्यातून यश कसे प्रकाशमान करण्यासाठी संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाचा उपयोग करुन आता संस्थात्मक जीवनामध्ये नवी चेतना आणता येते. गरजा,अनुभव व आणि समता लक्षात घेऊन नवी व्यूहरचना करण्यावर भर दिला जात आहे. त्याची नियंत्रण नियोजन व समन्वयी गरज आहे.

समारोप
अशा प्रकारे नवे जाग ही आता गुणवत्तेचा अखंड शोध घेत आहे. नव्या जागामध्ये मनुष्यबळ विकासही एक नवीन शक्ती आहे. आणि तिची जोपासना  जर योजकतेने करावयाची असेल तर भावी नियोजनाची गरज आहे. समता संवर्धन,गुणवत्ता परिवर्तन आणि कार्यक्षमता वाढही एक निरंतर प्रक्रिया आहे. हे लक्षात घेऊन भविष्यकाळात आपल्या मागणी आणि पुरवठा तंत्रात बदल करावा लागेल. प्रगत तंत्रज्ञानाचा आणि प्रगत आयुधांचा उपयोग  करुन नवीन दृष्टीने मनष्यबळ विकासाकडे पहिले तरच भावी काळात चित्र अधिक आशादायी व अधिक फलदायी होऊ शकेल. आता या दृष्टीने  एका नव्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत संवाद क्रांतीमुळे सारे जग खेडे बनले आहे. आणि माहितीची लाट नव्या संधी घेऊन येत आहे. त्यांचा पुरेपुर वापर केला तरच भारत महासत्ता होऊ शकेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमचा ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.

*

( Press Ctrl+g to toggle between English and Marathi )