राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान

प्रतिक्रिया

नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2012 सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करताना राष्ट्रपती प्रतिभा पाटील.

दिल्ली  (वृत्तसंस्था)-  केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांचे वितरण आज नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार सोहळयात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले.
देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन उद्योगाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केंद्रीय पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांनी केले. केंद्र सरकारच्या नवनव्या, वैविध्यपूर्ण उपक्रमांना पर्यटन उद्योगाने पाठिंबा द्यावा, केंद्र सरकार केवळ सुविधा निर्माण करून देऊ शकते मात्र या क्षेत्राला सक्रिय चालना पर्यटन उद्योगजगतच देऊ शकते, असे सहाय यांनी सांगितले. पर्यटकांना भारताकडे आकर्षित करून घेण्यासाठी तसेच त्यांनी वारंवार भेट देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
प्रवास, पर्यटन आणि सेवा उद्योगातल्या 50 हून अधिक प्रकारात यंदा 78 जणांनी पुरस्कार पटकावले. यात सर्वोत्तम वैद्यकीय पर्यटन सुविधेचा पुरस्कार पुण्याच्या “रुबी हॉल क्लिनीक”ला मिळाला.
तर 100 कोटी व त्यापेक्षा अधिक परकीय चलन मिळवल्याबद्दलच्या पुरस्कारांमध्ये “थॉमस कुक इंडिया लिमिटेड मुंबई” या कंपनीचा तिसरा क्रमांक लागला. देशांतर्गत टूर ऑपरेटर्स पुरस्कारांच्या वर्गवारीमध्ये नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमचा ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.

*

( Press Ctrl+g to toggle between English and Marathi )