“लेक वाचवा राष्ट्र वाचवा’ जनजागृती रॅली 4 ऑक्टोंबर रोजी

प्रतिक्रिया

"लेक वाचवा राष्ट्र वाचवा' जनजागृती रॅलीबाबत माहिती देताना आ. पंकजा पालवे. सोबत माजी महापौर भागवत कराड, विजयाताई रहाटकर, उपमहापौर प्रशांत देसरडा, केनेकर, भाऊसाहेब ताठे आदी. (छायाः भीमाशंकर नावंदे)

औरंगाबाद (प्रतिनिधी)- मराठवाड्यात मुलींचे घटते प्रमाण हे धोकादायक असून त्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात जनजागृती करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन येत्या 4 ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आ. पंकजा मुंडे यांनी आज (दि.20) पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सर्वाधिक मुलींचे कमी प्रमाण हे बीड जिल्ह्यात झाले आहे. त्यानंतर मराठवाड्याच्या इतर जिह्याचीही परिस्थिती अशीच आहे.  मुलींच्या जन्मासाठी समाजात जनजागृती करण्याचे काम वैद्यनाथ सर्वांगिण विकास संस्थेने हाती घेतले आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यात येत आहे. त्यासाठी रॅली, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासारख्या स्पर्धेतून लोक जागृती करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने माझी कन्या “भाग्यश्री’ ही योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या नावाने मुदत ठेव (एफ.डी.) म्हणून 1 हजार रूपये जमा करण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याची माहिती आ. मुंडे यांनी दिली.
या प्रसंगी पुढे बोलतांना आ. मुंडे म्हणाल्या की, दुर्गा ही नारी शक्तीचे रुप आहे. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात दुर्गाष्टमीला लेक वाचवा राष्ट्र वाचवा अभियांनातंर्गत जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला प्रसिध्द अभिनेत्री भाग्यश्री पटर्वधन संबोधित करणार आहे. त्यामुळे जास्ती जास्त संख्यने या अभियानात सहभागी होऊन लेक वाचवा राष्ट्र वाचवा संदेश घराघरापर्यंत पोहचविण्यास हातभार लावण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन आ. मुंडे यांनी केले.
यावेळी उपमहापौर प्रशांत देसरडा, माजी महापौर डॉ. भागवत कराड, विजया राहटकर, गटनेता संजय केनेकर, माजी नगरसेवक भगवान घडामोडे, भाऊसाहेब ताठे  यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमचा ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.

*

( Press Ctrl+g to toggle between English and Marathi )