जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांची भूमी अभिलेख कार्यालयास भेट

प्रतिक्रिया

औरंगाबाद  (प्रतिनिधी) – जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख चंद्रकांत दळवी यांनी उपसंचालक, भुमि अभिलेख कार्यालय, औरंगाबादला नुकतीच भेट दिली. यावेळी उपसंचालक भुमि अभिलेख श्री. वसंत मुळे, उपसंचालक भुमि अभिलेख (नागरी भुमापन ) जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे, विलास पाटील तसेच भुमि अभिलेख प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. बाळासाहेब काळे, एम.ए.सय्यद, जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख व भुमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.  भुमि अभिलेख प्रशिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम प्रशिक्षण संस्थेबाबत जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसंचालक भुमि अभिलेख कार्यालयातील विविध विभागांना श्री.दळवी यांनी भेट देवून पाहणी केली व कामकाजाचा आढावा घेतला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमचा ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही.

*

( Press Ctrl+g to toggle between English and Marathi )